इयत्ता 10वी मराठी | मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | प्रश्नोत्तरे | Maharashtra Board


👉 मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)



 

  कृती प्रश्नोत्तरे

प्रश्न १) खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.

१) बीचे झाड होणे

  1. बीज
  2. माती
  3. झाड होणे

२) माणसाचे माणूसपण जागे होणे

  1. माणूस
  2. प्रगल्भता
  3. माणुसकी

प्रश्न २) ‘माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.

उत्तर : कवी वीर राठोड यांनी ‘मनक्या पेरेन लागा ' या कवितेत ‘बीज व माती’ यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसाने पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे. माती व बीज यांच्या प्रतीकातून कवीने एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास मातीच्या ममतेने जोपासला जातो. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याप्रमाणे समाजरूपी मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले, तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल. म्हणून ‘माणसं पेरा’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.


प्रश्न ३) ‘माणूस पेरा! माणुसकी उगवेल!’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर : मातीत बी पेरले की मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते आणि दुष्काळाशी लढण्याचे सामर्थ्य देते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्कारांच्या मातीत जर माणसांची पेरणी केली, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवतेचा सुगंध दरवळेल. म्हणून ‘माणूस पेरा! माणुसकी उगवेल!’ या विधानातून माणुसकी, मानवता आणि चांगल्या संस्कारांचे महत्त्व स्पष्ट होते.


प्रश्न ४) ‘माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

उत्तर : मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेतून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन, वारा, पाऊस आणि वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकातून कवीने सामाजिक आशय मांडला आहे. आज भ्रष्टाचार, द्वेष, अंधश्रद्धा व इतर धार्मिक घटकांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकीला ग्रहण लागले आहे. अशा आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजे विवेकी, सुसंस्कारी आणि माणुसकी जपणारा माणूस निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.





Comments

Popular posts from this blog

Worlds of Coordination – Std. 6 Geography | Complete Notes, Questions & Answers

बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन-1) प्रश्नोत्तरे | Class 10 Kumarbharati Marathi Medium

लक्ष्मी स्वाध्याय | कक्षा 10 हिंदी लोकभारती Chapter 2 प्रश्न-उत्तर | महाराष्ट्र बोर्ड | Rukmini Classes