इयत्ता १०वी मराठी कुमारभारती पाठ ७वा गवताचे पाते स्वाध्याय | प्रश्नोत्तरे
७. गवताचे पाते
![]() |
| Rukmini Classess.com |
![]() |
| Rukmini Classess.com |
![]() |
| Rukmini Classess.com |
(२) कारणे लिहा.
(अ) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.
(आ) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी ‘आ’सुद्धा केला नव्हता.
(इ) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.
(३) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
(अ) बेजबाबदारपणा
उत्तर :
जर
जप
दाब
दार
दाणा
बाब
बाप
बाणा
बेजबाब
जबाब
(आ) धरणीमाता
उत्तर :
धर
धरणी
रणी
तार
रमा
मार
माता
(इ) बालपण
उत्तर :
बाल
बाप
बाण
लप
पण
(४) खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
उत्तर :
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. “एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो.” तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे.”
ते म्हणाले, “तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू.”
यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, “सर, शून्याला शून्याने भागले तर?”
त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय.
(5) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(अ) ज्ञानी × सुज्ञ
(आ) निरर्थक × अर्थपूर्ण
(इ) ऐच्छिक × अनिवार्य
(ई) दुर्बोध × सुबोध
उत्तर : (अ) ज्ञानी × सुज्ञ
६. स्वमत
अ) ‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते,’ हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर : माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उडवून लावलेले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते?
उत्तर : मी गवतापाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :
“आजोबा, आपण दोघेही कारण भांडत आहोत काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी रूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने बोललो असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोरच बोलू म्हणालात. मला उर्सिक म्हणालात. पण मी अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकांच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांची दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपण प्रत्येकाला स्वतःच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.
आता हेच पाहा ना. तुम्ही या जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भूतलाच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो, म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघांनी गुण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांचीही भूमिका कळेल आणि आपण भांडणार नाही.
आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून सांभाळून चला. स्वतःच्या प्रकृतीला जपा.”
इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उत्तर : हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट... पट... पट...
त्यांचा तो पट... पट... पट... असा कर्णकर्कश आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, “अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलं-बिगलं तर नाही ना?”
पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, “काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे?”
“छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?”
“काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे.”
“पण आता वय झालं ना! काय करणार?”
“असं का बोलतोस? वय झालं म्हणतात, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!”
हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.
ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोप लागली. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. झाडांकडे पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!
ई) खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे कसे व्हावे असे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करायचे, कुठेही जायचे स्वातंत्र्य असते. मुलांना बंधने असतात. थोडे मोठे झाल्यानंतर मुलांना मोठ्यांना न सांगता स्वतंत्रपणे वागावेसे वाटते. मुलांचे बंधन कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना थोडे स्वातंत्र्य द्यायला लागते. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे-कानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दरावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.



Comments
Post a Comment