इयत्ता १०वी कुमारभारती | पाठ ५ वसंतहृदय चैत्र | कृती व प्रश्नोत्तरे | Maharashtra Board

५. वसंतहृदय चैत्र

🌸 स्वाध्यायाकडे वाटचाल


‘वसंतहृदय चैत्र’ या पाठातून चैत्र महिन्यातील निसर्गसौंदर्य, नवपालवी, फुलांचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या घरट्यांचे मनोहारी वर्णन अनुभवायला मिळते. या पाठातील आशय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खालील स्वाध्यायातील कृती व प्रश्नोत्तरे काळजीपूर्वक सोडवूया.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन उत्तरे सोप्या, स्पष्ट आणि मुद्देसूद भाषेत दिली आहेत. विद्यार्थ्यांनी उत्तरे समजून घेऊन स्वतःच्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न करावा.

५. वसंतहृदय चैत्र

कृती 

(१) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरूनझाडाचे / वेलीचे नाव लिहा.

(अ) निळसर फुलांचे तुरेकडुनिंबाचे झाड 

(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवीपिंपळाचे झाड

(इ) गुलाबी गंधमधुमालती

(ई) कडवट उग्र वासकरंजाचे झाड

(उ) दुरंगी फुलेघाणेरी

(ऊ) तीन पाकळ्यांचे फूलमाडाचे झाड

(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळेफणसाचे झाड

(२) खालील संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

(१) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.

उत्तर : वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर बोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.

(२) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.

उत्तर : अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.


(३) योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट

(१)  लांबलचक देठ

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी

(३) भुरभुरणारे जावळ

‘ब’ गट

(अ) माडाच्या लोंक्या

(आ) कैऱ्याचे गोळे

(इ) करंजाची कळी




उत्तर 

१) लांबलचक देठ  -----   कैऱ्याचे गोळे

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी ----- करंजाची कळी

(३) भुरभुरणारे जावळ ------ माडाच्या लोंक्या



(४) खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द अर्थ
निष्पर्ण पाने निघून गेलेला
निर्गंध गंध नसलेला
निर्वात हवा नसलेली जागा
निगर्वी गर्व नसलेला
निःस्वार्थी स्वार्थ नसलेला


(५) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

वाक्प्रचार : रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे

(अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
उत्तर : लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.

(आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
उत्तर : गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालत असतात.

(इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
उत्तर : मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.

(ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर : सध्या घरामध्ये उंदरांना पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

(६) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(१) अतुलनीय नीय कमनीय
(२) प्रादेशिक इक सामाजिक
(३) गुळगुळीत ईत खडबडीत
(४) अणकुचीदार दार दुकानदार

(७) खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.

(अ) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.
उत्तर : अश्विनी — विशेषनाम    पुस्तक — सामान्यनाम

(आ) अजय आजच मुंबईहून परत आला.
उत्तर : अजय — विशेषनाम    मुंबई — विशेषनाम

(इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते.
उत्तर : गुलाब — सामान्यनाम    सौंदर्य — भाववाचक नाम

(ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.
उत्तर : रश्मी — विशेषनाम    गोडवा — भाववाचक नाम


(८) खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.

जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.

(अ) कर्ण - (आ) सोबती - (इ) मार्ग - (ई) हर्ष

(अ) कर्णउत्तर : कान

(आ) सोबतीउत्तर : मित्र

(इ) मार्गउत्तर : वाट

(ई) हर्षउत्तर : आनंद

(९) स्वमत

(अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : चैत्र महिन्यात वसंत ऋतू ऐन भरात असतो. या काळात निसर्ग नवपालवी आणि विविध रंगांच्या फुलांनी बहरून जातो. चैत्रातील पिंपळाची नवपालवी विशेष मनमोहक दिसते. पिंपळाच्या पानांवर हिरव्या, पोपटी आणि गहिऱ्या गुलाबी रंगांच्या अनेक छटा दिसतात. ही कोवळी पाने उन्हात चमकू लागली की झाडावर गुलाबी रंगाचे सुंदर गेंद फुलल्यासारखे वाटते. वाऱ्याची झुळूक आली की पिंपळाची पाने सळसळू लागतात. त्यांची सळसळ मनाला आनंद आणि प्रसन्नता देते. चैत्रातील पिंपळाची नवपालवी सुंदर, आल्हाददायक, मनमोहक, विलोभनीय आणि रमणीय दिसते. त्यामुळे ती डोळ्यांचे पारणे फेडते.

(आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.

उत्तर : चैत्र महिन्यात सृष्टी निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघते. झाडांना नवीन पालवी फुटते, विविध रंगांची फुले उमलतात आणि सर्वत्र नवनिर्मितीचा आनंद दिसून येतो. या सुंदर निसर्गचित्रात पक्ष्यांची घरटी विशेष लक्ष वेधून घेतात. काही घरटी लोंबत्या आकारांची, काही गोलाकार तर काही पसरट असतात. पक्षी ही घरटी काड्या, गवत आणि इतर वस्तूंपासून कौशल्याने तयार करतात. ही घरटी निसर्गाच्या सुंदर चित्रातील वेगवेगळ्या आकृत्यांसारखी दिसतात. ती पाहताना आपण त्यांच्याजवळ थांबून त्यांचे सौंदर्य न्याहाळतो. म्हणूनच लेखिकेने पक्ष्यांच्या घरट्यांना ‘वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे’ असे म्हटले आहे. लेखिकेचे हे विधान योग्य आणि सार्थ आहे.

(इ) वसंत ऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.

उत्तर : वसंत ऋतू आला की मला माझ्या शाळेच्या सहलीची आठवण येते. त्या वेळी आमची सहल एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गेली होती. परिसर हिरवागार झाला होता. झाडांना नवीन पालवी फुटली होती आणि विविध रंगांची फुले उमलली होती. मंद वारा वाहत होता आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता. सर्वत्र आनंददायी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

आम्ही मित्र-मैत्रिणींनी फुलांनी बहरलेली झाडे, सुंदर निसर्ग आणि पक्ष्यांची घरटी पाहत सहलीचा आनंद घेतला. निसर्गाचे सुंदर रूप पाहून आमचे मन आनंदाने भरून गेले. आम्ही एकत्र खेळलो, गप्पा मारल्या आणि अनेक आनंदाचे क्षण अनुभवले. त्या दिवसाची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. वसंत ऋतू आला की त्या रम्य सहलीची आणि मित्रांसोबत घालवलेल्या आनंददायी क्षणांची आठवण मला आवर्जून येते.








Comments

Popular posts from this blog

बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन-1) प्रश्नोत्तरे | Class 10 Kumarbharati Marathi Medium

लक्ष्मी स्वाध्याय | कक्षा 10 हिंदी लोकभारती Chapter 2 प्रश्न-उत्तर | महाराष्ट्र बोर्ड | Rukmini Classes

पाठ १ : क्षेत्रभेट स्वाध्याय | इयत्ता १० वी भूगोल | मराठी माध्यम | महाराष्ट्र बोर्ड | संपूर्ण उत्तरे