जय जय हे भारत देशा कविता | मंगेश पाडगावकर | इयत्ता १०वी मराठी | Maharashtra Board

 

१. जय जय हे भारत देशा

कवी : मंगेश पाडगावकर

(१९२९ – २०१५)

तू नव्या जगाची आशा
जय जय हे भारत देशा

तपोवनातुन तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी
मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी
जय युगधैर्याच्या देशा
जय नवसूर्याच्या देशा

तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा

बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना
अन्यायाला भरे कापरे बघुनि शूर अभिमाना
जय आत्मशक्तिच्या देशा
जय त्यागभक्तिच्या देशा

तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा

श्रमांतुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद
घामाच्या थेंबांतुन सांडे हृदयातिल आनंद
जय हरित क्रांतिच्या देशा
जय विश्वशांतिच्या देशा

तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा

पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली
अंधाराला जाळित उठल्या झळकत लाख मशाली
जय लोकशक्तिच्या देशा
जय दलितमुक्तिच्या देशा

तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा

✦ कवी परिचय ✦

मंगेश पाडगावकर (१९२९–२०१५)

प्रसिद्ध मराठी कवी. त्यांच्या कवितांमध्ये गेयता, शब्दसौंदर्य आणि भावपूर्णता यांचा सुंदर संगम आढळतो.

🇮🇳 जय हिंद! 🇮🇳
देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणारी सुंदर कविता.

Comments

Popular posts from this blog

बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन-1) प्रश्नोत्तरे | Class 10 Kumarbharati Marathi Medium

लक्ष्मी स्वाध्याय | कक्षा 10 हिंदी लोकभारती Chapter 2 प्रश्न-उत्तर | महाराष्ट्र बोर्ड | Rukmini Classes

पाठ १ : क्षेत्रभेट स्वाध्याय | इयत्ता १० वी भूगोल | मराठी माध्यम | महाराष्ट्र बोर्ड | संपूर्ण उत्तरे