धडा २ : स्थान – विस्तार | भूगोल | इयत्ता १० वी | प्रश्नोत्तरे

 

धडा २ : स्थान – विस्तार

प्र. १. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा :

(अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

उत्तर : योग्य.

(आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे.

(ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.

उत्तर : योग्य.

(उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.

(ऊ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.

उत्तर : योग्य.

प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :

  1. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
  2. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
  3. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले.
  4. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले.

(२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?

उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :

  1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.
  2. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.
  3. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
  4. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

(३) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.

उत्तर :

(अ) भारत :

(१) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' उत्तर अक्षवृत्तावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.

(२) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.

(ब) ब्राझील :

(१) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.

(२) रेखावृत्तीय विस्तार : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.

प्रश्न ३. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

(अ) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ..... नावाने ओळखले जाते.

(i) लक्षद्वीप

(ii) कन्याकुमारी

(iii) इंदिरा पॉईंट

(iv) पोर्ट ब्लेअर

उत्तर : भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते.

(आ) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

(i) चिली – इक्वेडोर

(ii) अर्जेंटिना – बोलिव्हिया

(iii) कोलंबिया – फ्रेंच गियाना

(iv) सुरीनाम – उरुग्वे

उत्तर : दक्षिण अमेरिका खंडातील चिली – इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

(इ) दोन्ही देशांतील राजवट .... प्रकारची आहे.

(i) लष्करी

(ii) साम्यवादी

(iii) प्रजासत्ताक

(iv) अध्यक्षीय

उत्तर : दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.

(ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?



इयत्ता १० वी भूगोल | धडा २ : स्थान – विस्तार

Comments

Popular posts from this blog

बालसाहित्यिका गिरिजा कीर (स्थूलवाचन-1) प्रश्नोत्तरे | Class 10 Kumarbharati Marathi Medium

लक्ष्मी स्वाध्याय | कक्षा 10 हिंदी लोकभारती Chapter 2 प्रश्न-उत्तर | महाराष्ट्र बोर्ड | Rukmini Classes

पाठ १ : क्षेत्रभेट स्वाध्याय | इयत्ता १० वी भूगोल | मराठी माध्यम | महाराष्ट्र बोर्ड | संपूर्ण उत्तरे