Class 10 Marathi | आजी : कुटुंबाचं आगळं | Complete Swadhyay Answers | Maharashtra Board
३ . आजी : कुटुंबाचं आगळ
📖 इयत्ता १० वी मराठी कुमारभारती – पाठ ३ : आजी : कुटुंबाचं आगळं
या लेखात इयत्ता १० वी महाराष्ट्र बोर्ड मराठी कुमारभारती मधील पाठ ३ – आजी : कुटुंबाचं आगळं या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरे सोप्या आणि परीक्षाभिमुख भाषेत दिली आहेत. ही उत्तरे विद्यार्थ्यांना अभ्यास, पुनरावृत्ती आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
चला, आता स्वाध्याय प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया.
(२) खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
आजी
- आजीचे दिसणे
- आजीचे राहणीमान
- आजीची शिस्त
- आजीचे दिसणे :
- आजीचे राहणीमान :
- आजीची शिस्त :
(४) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा.
(अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
(इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
(५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची)
(अ) समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला.
(इ) विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.
(ई) रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
(७) स्वमत.
(अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेलाअर्थ लिहा.
उत्तर :
'आगळ' या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतील बायकाही जमा व्हायच्या. निवड-टिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी त्या बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.
वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक त्या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.
(आ) तुलना करा/साम्य लिहा.
आगळ-वाड्याचे कवच, आजी-कुटुंबाचे संरक्षक कवच.
उत्तर :
आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळे आगळ हे वाड्याचे भक्कम संरक्षक कवच होते.
प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी अशीच होती. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसांत हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्वांना आपापली कामे करावी लागत होती. त्यामुळे कुटुंबात कोणावरही अन्याय होत नव्हता आणि कोणालाही तक्रार करण्याची वेळ येत नव्हती. आजी प्रत्येकाला संरक्षण, न्याय व शिस्त देत होती. म्हणून आजी ही कुटुंबाचे संरक्षक कवच होती, जशी आगळ वाड्याचे संरक्षक कवच होती.
(इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे चित्रण आले आहे. त्या काळात आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबातील सर्व बाबींवर व सर्व व्यक्तींवर तिचे नियंत्रण होते. कोणकोणती कामे, कधी व कशी करावीत, हे आजीच ठरवत असे.
या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांत एकसूत्रीपणा येत असे आणि कामे सुरळीतपणे पार पडत असत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा फायदा होत असे. मात्र या पद्धतीत व्यक्तिस्वातंत्र्याला फारसा वाव नव्हता. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. कोणालाही स्वतःच्या आवडीनुसार वागण्याची किंवा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदही मनाप्रमाणे घेता येत नव्हता. विशेषतः स्त्रियांना पूर्ण पारतंत्र्यात राहावे लागत असे. त्यामुळे आधुनिक काळात ही एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणावर टिकू शकली नाही.
(ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर :
ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती भक्कम भिंत बांधलेली असे. भिंतीत मजबूत दार असून त्याला कड्या-कोयंडे आणि एक भलीमोठी आगळ बसवलेली असे. एकदा आगळ लावली की घर पूर्णपणे सुरक्षित होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे आणि बाहेरूनही कोणी आत येऊ शकत नसे. त्यामुळे घराला संपूर्ण संरक्षण मिळत असे. म्हणून ग्रामीण जीवनात आगळीला विशेष महत्त्व होते.
प्रस्तुत पाठात आजी ही त्या कुटुंबाची आगळ असल्याचे दाखवले आहे. तिच्या शिस्तीमुळे आणि दराऱ्यामुळे कुटुंबातील सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. तिच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील सदस्यांवर आवश्यक बंधने होती. त्यामुळे कोणीही गैरवर्तन करू शकत नव्हते आणि कुटुंबात सुव्यवस्था टिकून राहत होती. अशा प्रकारे आजीने कुटुंबाला अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही प्रकारचे संरक्षण दिले. म्हणून "आजी : कुटुंबाचं आगळ" हे शीर्षक अत्यंत समर्पक ठरते.




Comments
Post a Comment