इयत्ता १० वी मराठी कुमारभारती पाठ २ – बोलतो मराठी | संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरे | SSC Maharashtra Board
पाठ २ : बोलतो मराठी
इयत्ता १० वी मराठी कुमारभारती – पाठ २ : बोलतो मराठी | संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
या ब्लॉगमध्ये इयत्ता १० वी मराठी कुमारभारती मधील पाठ २ – "बोलतो मराठी" या धड्याची संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरे दिली आहेत. ही उत्तरे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Maharashtra Board) नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आली आहेत. सर्व उत्तरे सोप्या, अचूक आणि परीक्षाभिमुख पद्धतीने मांडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल.
चला तर, आता "बोलतो मराठी" या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहूया.
![]() |
![]() |
![]() |
(
3) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) मराठी भाषेची खास शैली → वाक्प्रचार
(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा → हवा
(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन → शब्दकोश
(४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन → चैन
(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल → हस्त
(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय → विनोद
(ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत → कांता
(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध → प्रज्ञा
५) पुढे दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा :
(अ) रस्ते → रस्ता
वाक्य: हा रस्ता शाळेकडे जातो.
(आ) वेळा → वेळ
वाक्य: वेळ अमूल्य असते.
(इ) भिंती → भिंत
वाक्य: भिंत पांढऱ्या रंगाने रंगवली आहे.
(ई) विहिरी → विहीर
वाक्य: गावात एक जुनी विहीर आहे.
(उ) घड्याळे → घड्याळ
वाक्य: माझे घड्याळ वेळ बरोबर दाखवते.
(ऊ) माणसे → माणूस
वाक्य: माणूस नेहमी प्रामाणिक असावा.
(६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(अ) पसरवलेली खोटी बातमी
उत्तर: अफवा
(आ) ज्याला मरण नाही असा
उत्तर: अमर
(इ) समाजाची सेवा करणारा
उत्तर: समाजसेवक
(ई) संपादन करणारा
उत्तर: संपादक
(७) स्वमत
(अ) 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थछटा लिहा.
उत्तर :
'तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, "बाळा, तू शहाणा आहेस," असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते. आपला मुलगा विवेकी आहे. तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, असा तिला विश्वास असतो. कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते.
मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्या साठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना 'तुम्ही शहाणे आहात,' असे ऐकवावे लागते. येथे 'शहाणे' हा शब्द वापरलेला असला, तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही अतिशहाणे आहात,' म्हणजे 'तुम्ही मूर्ख आहात,' असेच म्हणत असतो.
(आ) 'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये,' या लेखिकेच्या मता बाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
उत्तर :
परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणालाही शंका येणार नाही.
मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि तेही आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना! अलीकडे "ती पिवळीवाली बॅग द्या," "तो पांढरावाला पट्टा दाखवा," अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग' यांत कोणताही फरक नाही. 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना 'पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'वाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थात कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकेचे मत योग्यच आहे.
(इ) लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटुलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.



Comments
Post a Comment